2 Kings 15:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.