2 Kings 16:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग उरीया याजकाला त्याने आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे धान्यार्पण, देशातील सर्व लोकांचे पेयार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्या साठी असावी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आहाज राजाने उरीया याजकाला आज्ञा केली की, “नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली, आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावीत; होमबली व इतर यज्ञपशू ह्यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे; पितळेची वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आहाज राजाने उरीयाह याजकाला हे आदेश दिले: “या नव्या मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, राजाची होमार्पण, अन्नार्पण आणि देशातील सर्व लोकांची होमार्पण, आणि त्यांची पेयार्पण ही अर्पण करीत जा. होमार्पणाचे सर्व रक्त आणि यज्ञाचे सर्व रक्त या वेदीवर शिंपडावे. कास्याची जुनी वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजा आहाजाने उरीया याजकाला आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, देशातील सर्व लोकांचे होमार्पण व त्यांचे अन्नार्पण व त्यांची पेयार्पणे, राजाचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरिता माझ्यासाठी असावी.”