2 Kings 16:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शब्बाथ दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधली होती ती व राजाला बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे दार केले होते ते, ही दोन्ही मंदिरापासून वेगळी करण्यात आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अश्शूरच्या राजामुळे त्याने शब्बाथ दिवशी वापरल्या जाणाऱ्या याहवेहच्या मंदिरातील द्वारमंडप आणि राजासाठी बाहेरचा दरवाजा काढून टाकला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशही त्याने अश्शूरच्या राजासाठी परमेश्वराच्या मंदिरापासून फिरवला.