2 Kings 16:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये निषिध्द म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराचे आज्ञापालन करत नसे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वयाच्या विसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे वडील दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये वाईट म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करत नसे.