2 Kings 16:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरामचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला. तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक त्याठिकाणी स्थायिक झाले. अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळी अरामाचा राजा रसीन ह्याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा अरामात सामील केले व तेथल्या यहूदी लोकांना हाकून दिले; अरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी अरामचा राजा रसीनने एलाथ हे शहर जिंकून घेतले आणि त्याने यहूद्यांना हुसकावून लावले. ते अरामात सामील केले. त्या शहरातून व एदोमी लोकांनी येऊन एलाथ येथे वस्ती केली आणि आजही अरामी लोक तिथे राहत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामाचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला आणि तेथून त्याने सर्व यहूद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक एलाथात स्थायिक झाले आणि अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.