2 Kings 17:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलाचा मुलगा होशे हा शोमरोनमधून इस्राएलवर राज्य करु लागला. तेव्हा यहूदावर आहाजच्या सत्तेचे ते बारावे वर्ष होते. होशेने नऊ वर्षे राज्य केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा आहाज ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी होशे बिन एला हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने नऊ वर्षे राज्य केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले.