2 Kings 17:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले. तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले. यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने इस्राएलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले; तेव्हा लोकांनी नबाटपुत्र यराबाम ह्याला आपला राजा केले; त्या यराबामाने इस्राएलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराबामास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले.