2 Kings 17:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आजही हे लोक पूर्वीप्रमाणेच वागतात. ते परमेश्वराला मानत नाहीत. इस्राएलांचे नियमशास्त्र ते पाळत नाहीत. याकोबचे वंशज म्हणजे इस्राएल यांना परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या ते मानत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत; ते परमेश्वराचे भय बाळगत नाहीत; ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यांना इस्राएल हे नाव दिले त्या याकोबाच्या वंशजांना परमेश्वराने विहित केलेले नियमशास्त्र व आज्ञा ह्यांप्रमाणेही चालत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिटकून आहेत. ते परमेश्वराचा आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्राएल ठेवले, त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा, नियम, न्याय व नियमशास्त्र यांप्रमाणे ते आचरण करीत नाही.