2 Kings 17:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अश्शूराच्या राजाला होशेची फितुरी दिसून आली; त्याने मिसर देशाचा राजा सो ह्याच्याकडे जासूद पाठवले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूराच्या राजाला देत असे ती देण्याचे त्याने बंद केले, म्हणून अश्शूराच्या राजाने त्याला पकडून बेड्या घालून कारागृहात ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.