2 Kings 18:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही, परमेश्वराच्या कराराचा भंग केला. परमेश्वराचा सेवक मोशे याचे करार पाळले नाहीत म्हणून हे सर्व झाले. लोकांनी परमेश्वराचा करार जुमानला नाही, त्याची शिकवण ऐकली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याची वाणी मानली नाही व त्याचा करार मोडला; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने विहित केलेले सर्वकाही त्यांनी जुमानले नाही; ते, ते ऐकेनात व त्याप्रमाणे वागेनात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे अशासाठी झाले कारण त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराची आज्ञा पाळली नाही व त्यांचा करार मोडला; याहवेहचा सेवक मोशेने जे सर्व आज्ञापिले होते, ते त्यांनी ऐकले नाही किंवा त्याचे पालन केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी असे केले कारण इस्राएल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव, ह्याचा शब्द पाळला नाही. तर त्याच्या कराराचा भंग केला, म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञापिलेले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही.