2 Kings 18:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरूशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरूशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले.