2 Kings 18:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू कदाचित् असे म्हणशील, “आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो.” पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचावरील पूजास्थळे आणि वेदी काढून टाकल्या आणि “फक्त यरुशलेममधील वेदीपुढेच आराधना करावी” असे यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना सांगितले हे मला माहीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्याची उच्च स्थाने व वेदी काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला की, ‘ह्या एका वेदीपुढे यरुशलेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही यरुशलेममधील याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय”?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू कदाचित् असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो. पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचस्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहूदा व यरूशलेमेला म्हटले की, फक्त यरूशलेममधील याच वेदीपुढे आराधना करावी तोच तो आहे की नाही?