2 Kings 18:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणतो तसे परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हाला सांगतो, ‘परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूरचा राजा आपल्या शहराजा पराभव करु शकणार नाही.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूराच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवायला न लावो.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवतील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ असे म्हणून हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणतो परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हास सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूराचा राजा आपल्या शहराचा पराभव करु शकणार नाही.