2 Kings 18:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या भूमीसारख्याच दुसऱ्या भूमीत मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे ह्दयपरिवर्तन करु पाहात आहे. ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश ह्यात तुम्हांला नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही; परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिज्कीया तुमचे मन वळवू पाहील तेव्हा त्याचे ऐकू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहत आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.