2 Kings 18:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर हिज्कीयाच्या बाजूचा होता. त्यामुळे त्याने जे जे केले त्यात त्याला यश आले. अश्शूरच्या राजाविरुध्द बंड करुन हज्किीयाने त्याचे मांडलिकत्व नाकारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून परमेश्वर त्याच्यासोबत होता, आणि जिकडे तो जाई तिथे त्याची उन्नती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुध्द बंड केले व त्यांची सेवा केली नाही.