2 Kings 18:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनवर हल्ला केला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. हिज्कीयाच्या यहूदावरील सत्तेच्या चौथ्या वर्षी (म्हणजेच एलाचा मुलगा होशे याचे इस्राएलवरच्या अधिपत्याचे सातवे वर्ष असताना) हे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी म्हणजे इस्राएलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी अश्शूरचा राजा शल्मनेसर ह्याने शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हिज्कीया राजाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा, एलाचा मुलगा होशे ह्याच्या सातव्या वर्षी, असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्यास वेढा घातला.