2 Kings 2:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याला ते म्हणाले, “हे बघ, आमच्याकडे पन्नास एक चांगली माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन पुन्हा कोठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये टाकले असेल.” पण अलीशा म्हणाला, “नाही, आता एलीयाचा शोध घ्यायला माणसे पाठवू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला म्हणाले, “पाहा, तुमच्या सेवकांकडे पन्नास बळकट पुरुष आहेत. त्यांना जाऊ द्या आणि तुमच्या स्वामीचा शोध घेऊ द्या. याहवेहच्या आत्म्याने त्यांना एखाद्या पर्वतशिखरावर, नाहीतर एखाद्या दरीत नेऊन टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नको, त्यांना पाठवू नका.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.”