2 Kings 2:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्या संदेष्ट्यांनी खूप मिनतवाऱ्या करुन अलीशाची पंचाईत करुन टाकली. शेवटी अलीशा म्हणाला, “ठीक आहे, पाठवा त्यांना एलीयाच्या शोधात.” मग त्या संदेष्ट्यांनी पन्नास जणांना एलीयाच्या शोधार्थ पाठवले. त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, “पाठवा.” त्यांनी पन्नास पुरुष पाठवले. त्यांनी त्याचा तीन दिवस शोध केला, पण त्यांना तो सापडला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांनी त्याला लाज वाटेपर्यंत आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” आणि त्यांनी पन्नास पुरुषांना पाठविले, ज्यांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला, परंतु ते त्याला शोधू शकले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही.