2 Kings 20:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वर, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला.