2 Kings 20:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तू करुणा भाकलीस ती मी ऐकली आणि तुझी अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्यास म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.