2 Kings 21:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या मुलाचाच बली देऊन मनश्शेने त्यास वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.