2 Kings 21:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करुन तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दावीदचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व नगरांमधून मी यरुशलेमची निवड केली आहे. यरुशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण केलेली अशेरामूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यात मी आपले नाम निरंतर ठेवीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.