2 Kings 22:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार ह्याची स्त्री असून ती त्या वेळी यरुशलेमेच्या दुसर्‍या पेठेत राहत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती पत्नी. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरूशलेमामध्ये दुसऱ्या भागात राहत होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”