2 Kings 22:19 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व ह्यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडलीस व माझ्यासमोर रडलास ह्यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरूशलेमेवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.” हे परमेश्वराचे शब्द आहेत.