2 Kings 23:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिन्नोमच्या मुलाचे खोरे या ठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बळी देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये अशातऱ्हेने भ्रष्ट करुन टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्‍यातील तोफेत अशुद्ध केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिन्नोमच्या मुलाचे खोरे याठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बली देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये असे भ्रष्ट करून टाकले.