2 Kings 23:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थ होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे घोडे यहूदाच्या राजांनी सूर्याला वाहून परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी नथनमेलेक नावाच्या खोजाच्या बाहेरल्या बाजूच्या कोठडीजवळ ठेवले होते, ते त्याने काढून टाकले आणि सूर्याचे रथ अग्नीने जाळून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थ यहूदाच्या राजाने दिले होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.