2 Kings 23:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यांतील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्या प्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योशीयाने वळून पाहिले तर डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या; त्याने माणसे पाठवून कबरांतून हाडे बाहेर काढून आणवली आणि ती त्या वेदीवर जाळून ती भ्रष्ट केली. ह्या गोष्टी विदित करणार्या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळवले होते त्याप्रमाणे हे घडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योशीयाहने चौफेर नजर फिरविली, तेव्हा त्याला डोंगराच्या बाजूला कित्येक कबरा आढळल्या, त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली की त्या कबरांमधील हाडे जमा करून ती बेथेलमधील वेदीवर जाळून ती वेदी भ्रष्ट करावी. जेव्हा यरोबोअम सणाच्या वेळी वेदीजवळ उभा राहिला होता तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहच्या संदेशानुसार भविष्यवाणी केली होती तसेच हे घडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यातील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्याप्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.