2 Kings 23:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?” तेव्हा गावातील लोकांनी त्याला सांगितले, “हे यहूदातून आलेल्या संदेष्ट्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करुन टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने विचारले, “माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे?” नगरातील लोकांनी त्याला सांगितले की, “तू ह्या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहूदातून येऊन विदित केले होते त्याचे हे थडगे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने विचारले, “पलीकडे जे कबरेचे स्मारक दिसते ते कोणाचे आहे?” तेव्हा शहरातील लोकांनी त्याला सांगितले, “हे परमेश्वराच्या संदेष्ट्याचे स्मारक आहे, जो यहूदीयातून आला होता आणि बेथेलच्या वेदीची नुकतीच जी पाडापाड केली, त्यासंबंधीचे भाकीत ज्या संदेष्ट्याने केले होते, त्याची ती कबर आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?” तेव्हा गावातील लोकांनी त्यास सांगितले, “हे यहूदातून आलेल्या देवाच्या मनुष्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करून टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.”