2 Kings 23:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूदांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन “माझे नाव राखणारी जागा” असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहूदासही दूर करीन; हे यरुशलेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नावाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो, त्याचाही मी त्याग करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’ त्यांचा त्याग करेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूद्यांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरूशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन. माझे नाव राखणारी जागा असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”