2 Kings 3:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर यहोशाफाट म्हणाला, “येथे एखादा परमेश्वराचा संदेष्टा नक्कीच असला पाहिजे. आपण काय करावे असे परमेश्वराला वाटते ते आपण त्यालाच विचारु या.” यहोरामचा एक सेवक म्हणाला, “शाफाटचा मुलगा अलीशा इथेच आहे. एलीयाच्या हातावर तो पाणी घालत असे, त्याचा तो सेवक होता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्‍न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु यहोशाफाटने विचारले, “याहवेहचा एखादा संदेष्टा इथे नाही काय, म्हणजे आपण याहवेहला विचारू शकू?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या अधिकार्‍याने उत्तर दिले, “शाफाटाचा पुत्र अलीशा इथे आहे. जो एलीयाहच्या हातावर पाणी घालत असे. ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.”