2 Kings 3:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा म्हणाला, “मी यहुदाचा राजा यहोशाफाट याचा आदर करतो व सर्वशक्तीमान परमेश्वराचा मी सेवक आहे. त्याला स्मरुन मी सांगतो की यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामुळे मी येथे आलो आहे. मी तुम्हाला खरे सांगतो जर यहूदाचा राजा यहोशाफाट इथे नसता तर मी तुझी दखलही घेतली नसती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीशा म्हणाला, “ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ; येथे असलेला यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला मी मान देत नसतो तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्यांच्या सान्निध्यात मी उभा राहतो, जर मला यहूदीयाचा राजा यहोशाफाट याच्याबद्दल आदर नसता तर मी तुमच्याकडे लक्ष दिले नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशा म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी उभा राहतो, तो सैन्याचा परमेश्वर जिवंत आहे. जर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या उपस्थितीचा मी आदर केला नसता, तर खरोखर मी तुझी दखल घेतली नसती व तुझ्याकडे पाहिलेही नसते.