2 Kings 3:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाच्या राजाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमच्या राजाला तो मारायला निघाला पण त्याला ते जमले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
युद्धात आपण अगदी जेर झालो असे मवाबाच्या राजाने पाहिले तेव्हा त्याने सातशे धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाचा राजा मेशाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमाच्या राजाला तो मारायला निघाला पण त्यास ते जमले नाही.