2 Kings 3:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले. हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बळी दिला. इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला. मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. ही घटना पाहून इस्राएली सैन्यास जबरदस्त धक्का बसला; किळस येऊन ते माघारी आपल्या देशाला परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मवाबाच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले, जो त्यानंतर त्याच्या गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बली दिला. तेव्हा इस्राएलवर मोठा कोप झाला. मग ते मवाबाचा राजा मेशा याला सोडून आपल्या देशात परत आले.