2 Kings 3:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने आपले दूत पाठवले. यहोरामने निरोप पाठवला, “मवाबच्या राजाने बंड केले आहे तेव्हा त्याच्यावर हल्ला करायला तुम्ही माझ्या बाजूने याल का?” यहोशाफाटने सांगितले, “होय, मी जरुर येईन तुझ्या माझ्यात काही भेदभाव नाही. माझे सैन्य, ते तुझे सैन्य माझे घोडे ते तुझे घोडे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने जाऊन यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला असा निरोप पाठवला की, “मवाबाचा राजा माझ्यावर उलटला आहे, तर त्याच्याशी लढायला आपण माझ्याबरोबर येता काय?” तो म्हणाला, “हो, मी येतो; आपण आणि मी एकच; माझे लोक ते आपले लोक; माझे घोडे ते आपले घोडे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा यहोशाफाटला हा निरोप पाठविला: “मोआबाच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यास माझ्यासोबत येशील काय?” यहोशाफाटने उत्तर दिले, “मी तुझ्यासोबत येईन. जसा तू तसा मी, जे माझे लोक ते तुझे लोक, जे माझे घोडे ते तुझे घोडे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, “मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरूद्ध लढाईला येशील काय?” यहोशाफाटाने सांगितले, “होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे.”