2 Kings 4:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीशाने तेव्हा आपला सेवक गेहजी त्याला त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले. त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपला सेवक गेहजी ह्याला म्हटले, “त्या शूनेमकरिणीला बोलावून आण.” त्याने तिला बोलावले, आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली.