2 Kings 4:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, “तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती बाई म्हणाली, “मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहात आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्या सेवकाला म्हणाला, “तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस; तुझ्यासाठी मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय?” ती म्हणाली, “मी आपल्या लोकांत नांदत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ” तिने उत्तर दिले, “मी तर माझ्या लोकांमध्येच राहते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशा त्यास म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.”