2 Kings 4:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा आणि ती बाई यांच्याअगोदरच गेहजी त्या घरी जाऊन पोचला. त्याने काठी त्या मुलाच्या चेहऱ्यावर टेकवली. पण ते मूल बोलले नाही की कसली चाहूल त्याला लागल्याचे दिसले नाही. तेव्हा गेहजी परत फिरला आणि अलीशाला म्हणाला, “मूल काही उठत नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडाला काठी लावली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलीशाकडे परत येऊन म्हणाला, “मूल काही जागे होत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्यास म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.”