2 Kings 4:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशा मग खोलीतून बाहेर पडला आणि घरातल्या घरात एक चक्कर मारली. मग पुन्हा खोलीत शिरुन मुलाच्या अंगावर पालथा पडला. मुलाला एकापाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याला सोडून तो घरात इकडेतिकडे फिरू लागला; व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाने सात वेळा शिंकून डोळे उघडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.