2 Kings 4:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकाची भाकर परमेश्वराच्या माणसासाठी घेऊन आला. त्याने सातूच्या वीस भाकऱ्या आणि पोतेभरुन कोवळी कणसे आणली होती. तेव्हा अलीशा म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बआल-शालीशा येथील कोणी मनुष्य आपल्या प्रथमउपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्याला म्हणाला, “ह्या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बआल-शालीश येथून एकदा एक मनुष्य आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या मनुष्यासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांस खायला दे.”