2 Kings 4:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशाचा सेवक म्हणाला, “काय? इथे तर शंभर माणसे आहेत. एवढ्या सगळ्यांना हे कसे पुरेल?” पण अलीशाने त्याला सांगितले, “तू खुशाल ते आहे तेवढे या सर्वांना दे. ‘ते पोटभर खातील आणि शिवाय त्यातून उरेल,’ असे परमेश्वर म्हणतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा सेवक म्हणाला, “काय? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ?” तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे; त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा सेवक म्हणाला, “शंभर मनुष्यांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.”