2 Kings 4:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ती स्त्री अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली.