2 Kings 4:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एके दिवशी असे झाले की अलीशा शूनेम येथे गेला; तेथे एक थोर स्त्री राहत होती; तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा तिकडून जाई तेव्हा त्या स्त्रीकडे जेवणासाठी थांबत असे.