2 Kings 5:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून नामान रागावून चालता झाला; तो म्हणाला, “पाहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.