2 Kings 5:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलीशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, “इस्राएल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वीतलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे; तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नामान व त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या मनुष्याकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले. तो म्हणाला, “पहा, सर्व पृथ्वीवर इस्राएलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”