2 Kings 5:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण अलीशा त्यांना म्हणाला, “मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही.” आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलीशाला परोपरीने विनवले पण अलीशाचा नकारच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काहीएक घेणार नाही.” त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला.