2 Kings 5:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा नामान म्हणाला, “माझ्या कडून तुम्ही भेट तर घेत नाहीच. मग एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी इस्राएलची माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली अर्पण करणार नाही. फक्त परमेश्वरासाठीच यज्ञ करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांच्या ओझ्याची माती द्या; कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवांना होमबली अर्पण करणार नाही की यज्ञही करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा नामान म्हणाला, माझ्यासाठी एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली किंवा यज्ञ अर्पण करणार नाही.