2 Kings 5:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि गेहजी नामानच्या मागे निघाला. नामानने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले. तेव्हा तो रथातून उतरला. त्याला गेहजी दिसला. नामान म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्यामागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्याला सामोरे जाऊन विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले, तेव्हा त्यास भेटायला तो रथातून खाली उतरला व म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”