2 Kings 5:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नामान म्हणाला, “जरुर, ही घ्या दीडशे पौंड चांदी.” नामानने गेहजीला ती चांदी घ्यायला लावली. नामानने ती दीडशे पौंड चांदी दोन थैल्यांमध्ये भरली आणि दोन वस्त्रांचे जोड घेतले. मग या वस्तू आपल्या दोन नोकरांच्या हवाली करुन गेहजीकडे त्या पोचवायला सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नामान म्हणाला, “कृपा करून दोन किक्कार घे.” त्याने आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोशाखांसह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यांवर ठेवल्या; हे सर्व घेऊन ते त्याच्यापुढे चालले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नामानाने उत्तर दिले, “मला तुला दोन किक्कार देण्यास आनंद होत आहे.” नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या.