2 Kings 5:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा आपण दु:खी आणि हतबल झालो आहोत हे दाखवण्यासाठी त्याने आपले कपडे फाडून घेतले. तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे की काय? छे छे! जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. असे असताना अरामच्या राजाने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बर पाठवावे? तसा विचार केला तर यात काही तरी कारस्थान दिसते. अरामचा राजा काही तरी कुरबूर सुरु करायच्या विचारात आहे!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पत्र वाचून इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली; तो म्हणाला, “ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे; मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा; पाहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले. तो म्हणाला, “मी देव आहे काय, जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. त्याने कोड असलेल्या मनुष्यास उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे.”