2 Kings 6:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या सैन्याने नगरात अन्न धान्य जाऊ देण्यास बंदी घातली. त्यामुळे शोमरोनमध्ये लोकांची अन्नान्न दशा झाली. गाढवाचे मुंडके ऐंशी रौप्यमुद्रांना आणि कबुतराची विष्ठा पाच रौप्यमुद्रांना विकली जाऊ लागली इतकी लोकांवर वाईट वेळ आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली; वेढा एवढा भारी पडला की, गाढवाच्या एका मुंडक्याला ऐंशी रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेला पाच रुपये पडू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यामुळे शोमरोनामध्ये महगाई वाढली. गाढवाचे मुंडके ऐंशी रुपयांना आणि कबुतराची पावशेर विष्ठा पांच रुपयांना विकली जाऊ लागली.